फेडरल बँकेने 'वनटॅग – फास्टॅग पोर्टेबिलिटी' सुरू केली असून, ग्राहकांना जुना फास्टॅग न बदलता तो फेडरल बँकेकडे हस्तांतरित करता येईल. ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते याचे अनावरण झाले. राजमार्गयात्रा ॲपवर नोंदणी व ओटीपीद्वारे संमती दिल्यानंतर ७२ तासांत प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. सध्या ही सुविधा कार, जीप व व्हॅनसाठी उपलब्ध आहे.
फेडरल बँकेची 'वनटॅग' सुविधा, जुना फास्टॅग न बदलता बँक बदलणे शक्य
Source: Prahaar