अमरावती विभागातील पावसाअभावी सुमारे ५० टक्के सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. पेरणीनंतर दीड महिना पाऊस न आल्याने विदर्भात दुष्काळाचे सावट आहे. मुख्यमंत्र्यांनी २३ सप्टेंबरपासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी शेतकऱ्यांना तातडीने मदत हवी आहे.
विदर्भात दुष्काळाचे सावट; सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान
Source: BBC Marathi