मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून सहा अफगाण नागरिकांना अटक करण्यात आली आहे. सहार पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून व्हिसाची मुदत संपल्यानंतरही हे नागरिक भारतात राहत होते. खोट्या जन्मस्थळाचा वापर करून पासपोर्ट मिळवल्याप्रकरणी त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
मुंबई विमानतळावर बनावट पासपोर्ट रॅकेटचा पर्दाफाश; ६ अफगाण नागरिक अटकेत
Source: Prahaar