जालन्यातील लोधी मोहल्ला परिसरात किरकोळ वादातून जिम ट्रेनर राहुल राजपूत यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, ५ हजार रुपयांच्या प्रोटीन पावडरच्या व्यवहारावरून हा वाद झाल्याचा संशय आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन आरोपींना अटक करून कदीम जालना पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालन्यात प्रोटीन पावडरच्या वादातून जिम ट्रेनरची हत्या
Source: Lokshahi Marathi