बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र डीप डिप्रेशनमध्ये रूपांतरित झाले असून, ते वायव्य दिशेने सरकत ओडिशामार्गे छत्तीसगडमध्ये पोहोचले आहे. पुढील 12 तास तीव्रता कायम राहून नंतर कमकुवत होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात शनिवारी जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडला येलो अलर्ट; सोमवारी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. राज्यात कुठेही ऑरेंज अलर्ट नाही.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र कमकुवत; महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट
Source: Mumbai Tak