मराठवाड्यात पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप पिके करपल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीड, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करून बांधावर पीक परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांनी नुकसानीची माहिती घेतली. पीकनुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून, एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मराठवाड्यात पीक नुकसानीची पाहणी, मदतीची ग्वाही
Source: Agrowon