मुंबईत अनंत चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ३६,२६८ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. यात ७,०५१ सार्वजनिक मंडळांच्या, २८,६५७ घरगुती आणि ५६० गौरीमूर्तींचा समावेश आहे. ढोल-ताशांच्या गजरात लाखो भाविक सहभागी झाले; ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी अनेक ठिकाणी डीजेऐवजी ढोल-ताशांचा वापर करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.
मुंबईत अनंत चतुर्दशीला ३६,२६८ गणेशमूर्तींचे विसर्जन
Source: Prahaar