आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले असले तरी सोमवारी, २८ सप्टेंबरला देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले. दिल्लीत पेट्रोल १०२.१२ रुपये तर मुंबईत १११.२१ रुपये प्रति लिटर आहे. मध्यपूर्वेतील तणावामुळे ब्रेंट क्रूड १.३ टक्क्यांनी वाढून १०५.७० डॉलर प्रति बॅरल झाले. इंधनदर रोज सकाळी ६ वाजता अद्ययावत होतात.
पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, कच्च्या तेलात मात्र वाढ
Source: Asianet Marathi