रत्नागिरीत एका अज्ञात आरोपीने वृद्ध व्यक्तीचा मोबाइल हॅक करून त्यांच्या बँक खात्यातून २ लाख रुपये स्वतःच्या खात्यात वळवले आणि ३ लाख ६६ हजार ४४१ रुपयांचे क्रेडिट कार्ड बिल भरले. एकाच दिवसात एकूण ५ लाख ६६ हजार ४४१ रुपयांची फसवणूक झाली. शिवाजीनगर येथील बिपिन रसिकलाल शहा यांनी तक्रार दिली असून रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सायबर विभागाच्या मदतीने तपास सुरू आहे.
रत्नागिरीत वृद्धाच्या मोबाइल हॅक करून ५.६६ लाखांची फसवणूक
Source: Jai Maharashtra News