धुळ्यातील अल्पभूधारक मजुरा कुटुंबाची नाशिकमध्ये अघोरी पूजा व जादूटोण्याच्या नावाखाली सुमारे एक लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाली. पंचवटीतील केवडीबन येथे पीडित महिलेला अघोरी स्नान घालून डोळ्यात लिंबाचा रस पिळण्यात आला. २१ वर्षांच्या मुलीचा जबरदस्तीने साखरपुडा घडवून आणल्याप्रकरणी संशयित मांत्रिक सरिता जाधव व साथीदारांवर धुळे शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून नाशिक पोलिसांच्या मदतीने त्यांना अटक केली आहे.
अघोरी पूजेच्या नावाखाली १.६ लाखांची फसवणूक; मांत्रिक महिला अटकेत
Source: Deshdoot