व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्रांमधील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीत ७३५ आरटीओ अधिकारी व निरीक्षक अडकले आहेत. परिवहन विभागाने ३०० अधिकाऱ्यांना नोटिसा बजावून लेखी खुलासे मागवले आहेत. सात सदस्यीय चौकशी समितीने परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे अहवाल सादर केला. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला असून निलंबनाची शक्यता आहे.
फिटनेस प्रमाणपत्र घोटाळा: ७३५ अधिकारी चौकशीत, ३०० जणांना नोटिसा
Source: Sarkarnama