महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने शिशु फॉर्म्युला, पूरक आहार आणि फीडिंग बॉटल्ससाठी कडक नियम लागू केले आहेत. फॉर्म्युला दुधाच्या जाहिराती, मोफत नमुने, कूपन, सवलती तसेच सोशल मीडिया प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. पॅकेजवर 'आईचे दूध सर्वोत्तम' अशी ठळक सूचना, वैद्यकीय सल्ला आणि सहा महिन्यांनंतरच पूरक आहार याचा उल्लेख बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास 3 ते 10 लाख रुपयांपर्यंत दंड आणि कारावासाची तरतूद आहे.
शिशु आहार जाहिरातींवर बंदी; पॅकेजवर 'आईचे दूध सर्वोत्तम' बंधनकारक
Source: Prahaar