अन्न-औषध प्रशासनाने (एफडीए) प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूच्या चोरट्या वाहतुकीविरुद्ध ठाणे जिल्ह्यात दोन ठिकाणी कारवाई केली. चारोटी टोल नाका व कसारा घाटात दोन ट्रक जेरबंद करून एकूण १ कोटी २६ लाख ६४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कसारा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कसारा घाटात एफडीएची कारवाई; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त
Source: Prahaar