पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथे निवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या निवासस्थानासह विविध मालमत्तांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी पहाटे एकाचवेळी छापे टाकले. खेडकर व पत्नी मनोरमा यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपासात ज्ञात उत्पन्नापेक्षा १३ कोटी ३० लाखांहून अधिक रकमेचा खर्च व मालमत्ता आढळली आहे.
१३.३० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचा ठपका; खेडकर यांच्या घरावर एसीबीचा छापा
Source: Deshdoot