अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना महायुतीतील धुसफूस आडवी आली आहे. बिनविरोध निवडणुकीच्या बैठकीत पक्षाला विश्वासात न घेतल्याने एकनाथ शिंदे शिवसेनेने स्वतंत्र बैठक घेत पूर्ण ताकदीने लढण्याचे संकेत दिले. आमदार अमोल खताळ आणि विठ्ठल लंघे या बैठकीला गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आले आहे.
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीवरून महायुतीत धुसफूस; शिंदे सेनेची स्वतंत्र भूमिका
Source: Sarkarnama