महाराष्ट्रातून मान्सून परतीच्या मार्गावर असून पुढील 2 ते 3 दिवसांत तो राज्यातून काढता पाय घेईल. यंदा कोकण-गोव्यात 14 टक्के तर मध्य महाराष्ट्रात 11 टक्के पावसाची तूट झाली असून सोलापूर, अहिल्यानगर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत ती 30 ते 40 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे रब्बी हंगाम व पिण्याच्या पाण्यावर परिणामाची शक्यता असून राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
महाराष्ट्रात मान्सूनची परती, पावसाच्या तुटीने शेतकऱ्यांची चिंता वाढली
Source: Jai Maharashtra News