बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पुढील १२ तासांत उत्तर व पश्चिम दिशेने सरकून कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २८ ते ३० तारखेदरम्यान मध्य महाराष्ट्र व घाट परिसरात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. २९ तारखेस नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी व रायगडच्या घाट भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता
Source: Mumbai Tak