भाजप मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी असा वाद झाला होता. शेखर गोरे यांच्या प्रवेशामुळे माण-खटाव भागात शिवसेनेची ताकद वाढेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
शेखर गोरे यांचा शिवसेनेत प्रवेश; सातारा जिल्हा बँक निवडणुकीत नवी समीकरणे
Source: Prahaar