राज्यातील २६५ हून अधिक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. कर्जवसुली स्थगिती, पीक कर्ज पुनर्गठन, जमीन महसुलात सवलत, रोजगार हमी वाढ आणि शिक्षण शुल्कात सवलत अशा १२ ते १३ उपाययोजना जाहीर केल्या. जलसंधारणावरही भर देऊन पाण्याची समस्या कायमची कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी १२ उपाययोजना; शिंदेंचा दिलासा
Source: Lokshahi Marathi