मुंबईत 'लोकशाही संवाद २०२६'मध्ये झीशान सिद्दीकी यांनी वडील बाबा सिद्दीकी यांच्या लोकसेवेचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. वांद्रे रेल्वे स्टेशनजवळील झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत ते म्हणाले की विकासाला विरोध नाही, मात्र कोणाचंही घर हिरावून घेतलं जाऊ नये. झोपडपट्टीवासीयांशी चर्चा करून योग्य पर्यायी घर देऊनच पुनर्वसन व्हावं, अशी भूमिका त्यांनी मांडली.
विकास हवा, पण कुणाचं घर हिरावून नाही: झीशान सिद्दीकी
Source: Lokshahi Marathi