महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू झाला असून, खरिपातील भात, सोयाबीन, कापूस, तूर, हळद व भाजीपाला पिके सुकली आहेत. संरक्षित सिंचन असलेल्या शेतकऱ्यांनाही वारंवार वीज खंडित व कमी दाबामुळे पिके वाचवता येत नाहीत. शेतकऱ्यांना दिवसा किमान आठ तास अखंडित वीज मिळावी, अशी मागणी होत आहे; सध्या फक्त चार ते सहा तास वीज मिळते.
दुष्काळात विजेची टंचाई; शेतकऱ्यांना अखंडित वीज नाही
Source: Agrowon