‘तेरा यार हूं मैं’ची टीम पुन्हा एकत्र आली असून ‘पहला प्यार दूसरी बार’मधील ‘पुराने दिन’ हे नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. अरिजित सिंगच्या आवाजातील या गाण्याला रोचक कोहली यांचं संगीत आणि कुमार यांचे शब्द लाभले आहेत. कॉलेज जीवन, पहिलं प्रेम आणि मैत्रीच्या आठवणी जागवणारं हे गाणं चाहत्यांना भावत आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित, अनुज सैनी दिग्दर्शित हा चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘पहला प्यार दूसरी बार’मधील ‘पुराने दिन’ गाणं रिलीज
Source: Lokshahi Marathi