दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या FZ1073 विमानात 30 सप्टेंबरला 34 हजार फुटांवर कॉकपिटमध्ये झटापट झाली. भारतीय कॅप्टन स्मित मच्छार जखमी झाले, विमानाची उंची काही सेकंदांत सुमारे 14,300 फूट घसरली. क्रू आणि प्रवाशांनी हल्लेखोराला नियंत्रणात घेतल्यावर विमानाने सौदी अरेबियातील तबूक येथे आपत्कालीन लँडिंग केले. मच्छार यांची प्रकृती स्थिर असून तपास सुरू आहे.
फ्लायदुबई विमानात कॉकपिट हल्ला; भारतीय कॅप्टन जखमी
Source: Lokshahi Marathi