मुंबई महापालिका शाळांमधील मध्यान्ह भोजनाच्या खिचडीच्या दर्जावर स्थायी समितीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. काही महिला बचत गटांचे किचन नसल्याचे तसेच खिचडीचा दर्जा निकृष्ट असल्याचे आढळले. त्यामुळे इस्कॉनसह सेंट्रल किचनचा विचार करण्याची मागणी झाली. ४५ संस्थांना २४६ कोटींचे कंत्राट असून काहींना काळ्या यादीत टाकल्याने प्रतीक्षा यादीतील संस्थांना सामावून घेण्याचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
महापालिका शाळांतील खिचडीवर प्रश्नचिन्ह; सेंट्रल किचनचा विचार
Source: Prahaar