मध्य रेल्वेने आसनगाव-कसारा तिसऱ्या मार्गिकेच्या कामासाठी ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान १२ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे नाशिकमार्गे धावणाऱ्या अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे इगतपुरी, खर्डी आणि आटगाव येथे नियमन होणार असून काही गाड्यांना विलंब होण्याची शक्यता आहे. ब्लॉकच्या कालावधीत आसनगाव-कसारा दरम्यानची उपनगरीय सेवा बंद राहील.
आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा विशेष ब्लॉक; एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम
Source: Prahaar