वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्र ते नेहरू तारांगण दरम्यानचा उड्डाणपूल व सब वे प्रकल्प ३१ जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले. प्रकल्पस्थळी भेट देऊन त्यांनी कामाचा आढावा घेतला. पुलामुळे वरळी नाका परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ सुमारे १५ मिनिटांनी घटण्याची अपेक्षा आहे.
नेहरू विज्ञान केंद्र उड्डाणपूल ३१ जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण
Source: Prahaar