मतदार यादीच्या विशेष सखोल पडताळणीची (एसआयआर) प्रक्रिया निवडणूक आयोगाने निश्चित कार्यपद्धतीनुसार जाहीर केली असून सर्व पक्षांना व नागरिकांना माहिती देण्यात आली आहे, असे सांगत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या प्रक्रियेविरोधातील आंदोलनाला घटनात्मक अधिष्ठान नसल्याची टीका केली. आक्षेप असल्यास निवडणूक आयोगासमोर किंवा न्यायालयीन मार्गाने मांडावेत, असे आवाहन त्यांनी केले.
एसआयआरविरोधातील आंदोलनाला घटनात्मक आधार नाही: शेलार
Source: Prahaar