संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जयंतीनिमित्त मुंबईत 'ज्ञानरंग: माऊलींच्या ओव्यांचा उत्सव' सोहळा पार पडला. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक असल्याचे सांगून प्रत्येकाने एक तरी ओवी आयुष्यात अनुभवावी, असे आवाहन केले. यावेळी त्यांच्या हस्ते 'ज्ञानरंग: ज्ञानेश्वरी' मोबाइल ॲपचे लोकार्पण झाले.
ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक: मोहन भागवत
Source: Prahaar