अभिजात मराठी भाषा सन्मान दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पुण्यातील डेक्कन कॉलेज येथे 'अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र' उभारण्यास मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ऑक्टोबर २०२४ मध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचा हा पुढील टप्पा असून, संशोधन व संवर्धनासाठी निधी उपलब्ध होणार आहे.
पुण्यात अभिजात मराठी भाषा अध्ययन केंद्राला केंद्राची मंजुरी
Source: Prahaar