मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या ८७७ किमी किनारपट्टीचा एकात्मिक विकास करण्यावर भर असल्याचे जाहीर केले. बंदरांना रस्ते-रेल्वे जोडणी, जलवाहतूक व औद्योगिक विकास जोडण्याचे उद्दिष्ट त्यांनी स्पष्ट केले. एससीआयच्या ६५व्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. वाढवण बंदर, जहाजबांधणी धोरण २०२५ आणि हरित तंत्रज्ञानावरही भर देण्यात येत आहे.
महाराष्ट्राच्या ८७७ किमी किनारपट्टीचा एकात्मिक विकास करणार: नितेश राणे
Source: Prahaar