पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ नोव्हेंबरला बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरात भेट देणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. दरम्यान, भाजपच्या विधानपरिषद उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता असून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेणार आहेत. महायुतीतील जागावाटपाचा तिढा मुंबईत न सुटल्याने नेते दिल्लीत जाणार असल्याचा दावा काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केला.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग
Source: Sarkarnama