नाशिक जिल्ह्यातील कांदा खरेदीतील कथित अनियमिततेबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांच्याकडे माहिती मागितली असता थेट उत्तर न देता टाळाटाळ करण्यात आली. दरम्यान, खरीप कांदा लागवड क्षेत्र निम्म्यावर आल्याने उत्पादन घटून दर वाढण्याची शक्यता आहे. किंमत स्थिरीकरण निधीअंतर्गत नाफेड व एनसीसीएफच्या खरेदीत गैरप्रकारांचे आरोप होत आहेत.
कांदा खरेदी अनियमिततेची चौकशी; खासदाराला माहिती नाकारली
Source: Agrowon