विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपाचा 3-1-1 फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. भाजपला पुणे शिक्षक, पुणे पदवीधर आणि नागपूर पदवीधर अशा तीन जागा, शिवसेनेला अमरावती शिक्षक तर राष्ट्रवादी काँग्रेसला छत्रपती संभाजीनगर पदवीधर जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपने १५ संभाव्य नावे केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली असून अंतिम उमेदवार जाहीर झालेले नाहीत. मतदान २३ ऑक्टोबरला होणार आहे.
विधानपरिषद निवडणुकीत महायुतीत 3-1-1 फॉर्म्युला ठरला
Source: Lokshahi Marathi