विधान परिषदेच्या पाच जागांसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटला असून पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला आहे. भाजप तीन, शिवसेना एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस एक अशा फॉर्म्युल्यानुसार पुणे शिक्षक, पुणे पदवीधर व नागपूर पदवीधर भाजप, अमरावती शिक्षक शिवसेना तर छत्रपती संभाजीनगर पदवीधर राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार आहे. मतदान २३ ऑक्टोबरला असून अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपला, महायुतीत जागावाटप ठरले
Source: Prahaar