शारजाह येथील वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स सामन्यात इंडिया चॅम्पियन्सने ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सचा ४६ धावांनी पराभव केला. कर्णधार युवराज सिंगने ४४ चेंडूत ७१ धावांची झंझावाती खेळी करत संघाला १९६ धावांपर्यंत नेले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा डाव १६.२ षटकांत १५० धावांवर आटोपला. धवल कुलकर्णीने ४ आणि मोहित शर्माने ३ बळी घेतले.
लेजेंड्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावर ४६ धावांनी विजय
Source: Asianet Marathi