पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनानिमित्त भाजपच्या 'सेवा संकल्प अभियाना'अंतर्गत मुंबईतील केसी महाविद्यालयात 'नमो सेवा–अनसुनी कहानियाँ' पथनाट्य उपक्रमाचा शुभारंभ झाला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कलाकारांचा सत्कार करण्यात आला. पिंपरी-चिंचवडमधील कलाकार हे पथनाट्य राज्यभर सादर करतील; 15 ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात एक मोठा प्रयोग आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान 10 प्रयोगांचे नियोजन आहे.
मुंबईत 'नमो सेवा–अनसुनी कहानियाँ' पथनाट्याचा शुभारंभ
Source: Lokshahi Marathi