सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विरोधकांच्या मोर्चावर टीका करत त्याला 'कोल्हेकुई' म्हटले. निवडणुकीत विजय मिळाल्यास ईव्हीएम आणि आयोग योग्य, पराभव झाल्यास आरोप करण्याची दुटप्पी भूमिका त्यांनी फोडली. ज्ञानेशकुमार निवडणूक आयुक्त झाल्यानंतरच्या सहा निवडणुकांत तीन ठिकाणी भाजप-एनडीएला यश आले, तर केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरीत गैर-भाजप सरकारे आली. एसआयआरमुळे मतदार यादी अधिक सुरक्षित होत असल्याचेही ते म्हणाले.
विरोधकांचा मोर्चा 'कोल्हेकुई'; शेलारांचा हल्लाबोल
Source: Prahaar