अकोला जिल्ह्यात कमी पावसामुळे सोयाबीनची उत्पादकता हेक्टरी शून्य ते ४० किलोपर्यंत घसरली आहे. जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ६०.८ टक्के पाऊस झाला, तर अकोला तालुक्यात ४९.९ टक्के. ऑगस्ट-सप्टेंबरमधील दीर्घ खंडामुळे शेंगा धरल्या नाहीत. पीक कापणी प्रयोगांतून हे स्पष्ट झाले असून काढणी व मळणीचा खर्चही निघणार नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
अकोल्यात सोयाबीन उत्पादकता हेक्टरी शून्य ते ४० किलोपर्यंत
Source: Agrowon