अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी विक्रमी ३६९ अर्ज दाखल झाले. नेवासा मतदारसंघातून शंकरराव गडाख यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. चंद्रशेखर घुले, सुजय विखे पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांसमोर कडवे आव्हाने आहेत. आज छाननी प्रक्रिया होत असून माघारीच्या टप्प्याकडे लक्ष लागले आहे.
अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी ३६९ अर्ज दाखल
Source: Sarkarnama