वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तीळ आणि चवळीच्या सहा वाणांना केंद्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. परभणी येथील सोयाबीन एमएयूएस ८२४ ची ईशान्य पर्वतीय राज्यांसाठी, तर कपाशीच्या दोन वाणांची महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशासाठी शिफारस करण्यात आली. या वाणांमुळे शेतकऱ्यांना रोगप्रतिकारक आणि अधिक उत्पादन देणारे पर्याय उपलब्ध होतील.
वनामकृविच्या सहा पिकांच्या वाणांना केंद्रीय मान्यता
Source: Agrowon