एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात पर्जन्यमान घटल्याने जलसंपदा विभागाने १६ ऑक्टोबरपासून सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किमान १० टक्के पाणीकपात लागू करण्याचे आदेश दिले आहेत. पिण्याचे व जनावरांचे पाणी, औद्योगिक व चारा गरज भागविल्यानंतर शिल्लक राहिल्यासच रब्बी पिकांना प्राधान्याने पाणी दिले जाईल. भूजल पातळीत सरासरी १.११ मीटर घट झाली असून अनधिकृत उपसा रोखण्यासाठी संयुक्त पथके गस्त घालतील.
एल निनोमुळे पाणीकपात; रब्बीसाठी शिल्लक पाणी
Source: Agrowon