लातूर जिल्ह्यात पावसाची सुमारे ५० टक्के तूट असून पिकांचे ८० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ९ पैकी ५ मोठ्या धरणांमध्ये पाणीसाठा शून्य आहे, तर मांजरा धरणात केवळ १० टक्के पाणी उरले आहे. प्रशासनाने पाणीपुरवठा दर ६ दिवसांनी करण्यास सुरुवात केली असून जानेवारीपर्यंत पाणी पुरवण्याचा प्रयत्न आहे.
लातूरमध्ये भीषण दुष्काळ, पाणीटंचाई ५० टक्के
Source: BBC Marathi