पिंपरी-चिंचवड महापालिकेने गेल्या पाच वर्षांत दहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत १८७ ओपन जिम उभारल्या आहेत. सांगवी, भोसरी, वाकडसारख्या भागांत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मोशी, चिखली व काळेवाडी परिसरात काही ठिकाणी उपकरणांचा वापर होत नाही. ४१ ठिकाणच्या जिमची तांत्रिक माहिती क्रीडा विभागाकडे नसल्याचे समोर आले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये १८७ ओपन जिम; काही ठिकाणी उपकरणे धूळ खात
Source: Pudhari