नाशिक महापालिकेत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सत्ताकाळात सत्तारूढ नगरसेवकच प्रशासनाविरोधात आक्रमक झाले आहेत. उद्यान विभागाच्या मनमानी कारभारावरून महासभेत गदारोळ झाला असून महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी दहा दिवसांत चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रशासन लोकप्रतिनिधींवर हावी होत असल्याची भावना वाढत असून सिंहस्थापूर्वी हा संघर्ष पालिकेच्या कामकाजासाठी घातक ठरू शकतो.
नाशिक महापालिकेत सत्तारूढ नगरसेवकांचा प्रशासनाविरोधात एल्गार
Source: Deshdoot