पंढरपूर येथे झालेल्या चौथ्या राष्ट्रीय केळी परिषदेत महासंघाचे अध्यक्ष किरण चव्हाण यांनी केळीला ३० रुपये ६० पैसे प्रति किलो हमीभाव देण्याची मागणी केली. केळीचा शालेय पोषण आहारात समावेश, पीकविमा आणि निर्यात धोरण या मागण्यांवर चार वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मध्य प्रदेशप्रमाणे हेक्टरी ३ लाख रुपये अनुदान देण्याचीही मागणी झाली.
केळीला ३०.६० रुपये हमीभावाची मागणी
Source: Agrowon