मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे विरोधी खासदारांचे आंदोलन दिल्लीत सलग तिसऱ्या दिवशी सुरू आहे. दुसरीकडे, देशभरातील 42 माजी न्यायाधीशांनी खुले पत्र लिहून निवडणूक आयोगासह घटनात्मक संस्थांना कमकुवत करण्याच्या प्रयत्नांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ठोस पुराव्यांशिवाय मतचोरीचे आरोप करून संस्थांची बदनामी केल्यास लोकशाहीवरील विश्वास कमी होण्याचा धोका त्यांनी इशारा दिला आहे.
निवडणूक आयोगावरील टीकेच्या पार्श्वभूमीवर 42 माजी न्यायाधीशांचे पत्र
Source: BBC Marathi