शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर छापा टाकला. ट्रॅक्टर-ट्रॉली आणि वाळू असे एकूण ५ लाख २० हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आले असून, चालक बाबु अकबर बेग (३१) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.
अवैध वाळू वाहतुकीवर छापा, ५.२० लाखांचा मुद्देमाल जप्त
Source: Deshdoot