मिरा-भाईंदरमध्ये एमबीव्हीव्ही पोलिसांच्या एसएस टीमने क्वालिटी इन हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटवर कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे झालेल्या या कारवाईत एजंट म्हणून काम करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार एका मॉडेलचा सुमारे ३० हजार रुपयांत सौदा केला जात होता. शीतल मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली असून, रॅकेटच्या नेटवर्कचा तपास सुरू आहे.
मिरा-भाईंदरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; महिला एजंट अटकेत
Source: Lokshahi Marathi