केंद्र सरकारने सर्व विनानियंत्रित कॅन्सर औषधांच्या ट्रेड मार्जिनवर ३० टक्के कमाल मर्यादा लागू करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी औषध कंपन्यांकडून अवाढव्य नफा आकारला जात होता, त्यामुळे औषधे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली होती. या निर्णयामुळे कमाल किरकोळ विक्री किमतीत ७० टक्क्यांपर्यंत घसरण होण्याची शक्यता असून लाखोचा उपचार खर्च कमी होईल.
कॅन्सर औषधांवर ३०% ट्रेड मार्जिन मर्यादा
Source: Jai Maharashtra News