मुंबई मलनि:सारण प्रकल्पांतर्गत घाटकोपर (पूर्व) येथे उभारण्यात येत असलेल्या ३३७ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या मलजल प्रक्रिया केंद्राची अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी केली. द्वितीय स्तरीय प्रक्रियेचे वाहिनी काम ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत तर संपूर्ण प्रकल्प ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रकल्पामुळे समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता सुधारून सागरी पर्यावरण व जलचर जीवनाचे संवर्धन होणार आहे.
घाटकोपर मलजल प्रक्रिया केंद्राचे काम वेळेत पूर्ण करा
Source: Prahaar